वॉशिंग्टन – ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या राबवित असतात. यामध्ये जगातील दिग्गज ऑनलाईन व्यापार करणारी कंपनी ऍमेझॉनने आपल्या शॉपिग ऍपमध्ये स्पीक-टू-शॉप ही सुविधा सुरु केली आहे. गुरुवारी कंपनीने या नवीन सुविधेबाबतची घोषणा कंपनीने केली आहे. या आवाजाची सूचना देत ग्राहक आपल्याला हवी असणारी वेगवेगळी उत्पादने बघून त्याची खरेदी करु शकणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
भारतामध्ये अँड्राईड ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असून आयओएस डिव्हाईसच्या ग्राहकांसाठी अपडेट करण्याचे बाकी आहे. ग्लोबल रोलआउटसाठी कंपनीने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. शॉपिग ऍपमध्ये ग्राहकाला इंग्लिशमध्येच बोलावे लागणार आहे. कारण या फिचरमध्ये इंग्लिश भाषा सपोर्ट करत असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. कंपनी लवकरच या शॉपिग ऍपमध्ये अन्य भाषांचा पर्याय देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अँड्राईड 5.1 ओएस डिव्हाईमध्ये सुविधा
कंपनीने सांगितले आहे की स्पीक-टू-शॉप फिचरसाठी ग्राहक ऍमेझॉन शॉपिग ऍपवर बोलून वेगवेगळया वर्गवारीतील उत्पादनं ग्राहकाला पाहता येणार आहेत. नवीन सुविधेमध्ये प्राईम आणि नॉन-प्राईम दोन्ही ग्राहकांना फायदा होणार आहे. यात अँड्राईड 5.1 ऑपर्रेटिंग सुविधेच्या वरती डिव्हाईस काम करणार आहे.