साकोरीकरांंकडून कोरोना वाॅरियर्सला अनोखा सलाम; प्रत्येकी 1000 रुपये देत केला सन्मान

साकोरी:- जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील करोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालून अंगणवाडी सेविका,मदतनीस,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,आरोग्य कर्मचारी, हायस्कूल शाळा शिक्षक व साकोरी ग्रामपंचायत कर्मचारी आशा ऐकून ३१ कर्मचाऱ्यांनी गेली दोन महिने दररोज संपूर्ण गावाचा कोरोना निर्मूलन व माहिती सर्वे केला.

अत्यंत प्रामाणिकपणे मोठे समाजकार्य त्यांनी केल्यामुळे त्यांचा सत्कार करून प्रशत्ती पत्रक दिले व त्यांच्या तोंडात पेढे भरून पुष्पवृष्टी करून सर्वांचे कौतुक केले.तसेच साकोरी ग्रामपंचायतिच्या वतीने प्रत्येकी एक हजार असे अनुदान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, गावचे सरपंच पांडुरंग साळवे, गबा पानसरे, दत्तात्रय विश्वासराव,विजय गगे,आशिष नेहरकर यांसह सर्व करोनाच्या संकटाशी लढणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.