मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून वादळ निर्माण करणारी अभिनेत्री ‘अदा शर्मा’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू झाला होता. अजूनही चित्रपटाबाबत सोशल मीडियावर लोक संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल 200 कोटींच्या क्लबमध्येही एंट्री घेतली आहे. अजून ही सोशल मीडियावर या सिनेमाची चर्चा होताना दिसते.
दरम्यान, या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ‘अदा शर्मा’ नेहमीच चर्चेत असते. इंस्टाग्रामवर देखील तिचे लाखो फॉलोवर्स असून, अदा नेहमीच आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अदा शर्मा एक व्हिडिओ शेअर केला असून, सध्या तिचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम आहे. आता अदानं “रखुमाई रखुमाई..’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अदाच्या या व्हिडीओला अवघ्या 30 ते 35 मिनिटांमध्ये लाखोहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मराठी भाषिक लोकांनी देखील तिचं चांगलंच कौतुक केलं आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अभिनेत्री अनेक मराठी गाणी आणि कवितांचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.