नागपुर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात दाऊदच्या नावाने खंडणी मागण्यासाठी धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. शंभर कोटी रूपयांची खंडणी द्या अन्यथा गडकरींच्या जीवाचे काही तरी बरेवाईट होईल असे फोन करणाऱ्याने त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगितले आहे असे त्यांच्यावतीने देण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या धमकीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला दोन फोन आले आणि तिसरा फोन साडे बाराच्या सुमाराला आला.
तेथील कर्मचाऱ्यांनी ही माहिती नागपुर पोलिसांच्या वरीष्ठांना कळवली असून त्यांनी हे फोन नेमके कोठून आले याचा तपास सुरू केला आहे.दरम्यान गडकरी यांना जादा संरक्षण पुरवण्यात आले आहे. गडकरी यांचे नागपुरच्या ऑरेंज सिटी रूग्णालयाजवळच्या भागात संपर्क कार्यालय आहे.तेथे त्यांना हे फोन आले आहेत.
Maharashtra | Union Minister Nitin Gadkari’s office in Nagpur received two threatening calls this morning. Nagpur Police say that further investigation is going on.
Visuals from outside the Minister’s office. pic.twitter.com/BMgcANvUOO
— ANI (@ANI) January 14, 2023
सुरक्षेत वाढ –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसही या कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी गडकरी यांचे नागपुरात कार्यक्रम आहेत. तर राष्ट्रीय पातळीवरील रस्ता सुरक्षा मोहिमेची आज सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून उद्योजक आणि राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याशिवाय, मुंबई पोलीस आयुक्तालयातही धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढले.