नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेच्या पंजाबातील फेरीच्यावेळी कॉंग्रेसचे खासदार संतोखसिंग चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ कॉंग्रेसने शनिवारी ही यात्रा एक दिवसासाठी स्थगित केली. राहुल गांधी यांची 15 जानेवारीला जालंधर येथे होणारी नियोजित पत्रकार परिषदही पुढे ढकलण्यात आली असून ती आता 17 जानेवारीला होशियारपूर येथे होणार आहे.
उद्या दुपारी खालसा कॉलेज मैदान, जालंधर येथून यात्रा पुन्हा सुरू होईल,” असे एआयसीसीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. दिवंगत कॉंग्रेस खासदारांच्या प्रति श्रद्धांजली म्हणून यात्रेच्या कार्यक्रमात हे बदल करण्यात आले आहेत. चौधरी यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.त्यांचे पार्थिक त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे.