नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सीतारामण यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना दुपारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांना खासगी वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Union Finance Minister Nirmala Sitharaman admitted to AIIMS Delhi for a routine check-up: Official sources
(file photo) pic.twitter.com/8Lsa809rpx
— ANI (@ANI) December 26, 2022
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांना एम्समधील खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.