बीजिंग : ‘चीन’ने कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळवण्याची घोषणा केली आहे. मात्र, कोरोना संकटामुळे चीनमध्ये अनेक जण बेरोजगार झाले आहेत. जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था एका वर्षात 6.8 टक्क्यांनी खाली आली आहे. त्यामुळे चीन सरकारपुढे गरिबी मिटवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूमुळे चिनी अर्थव्यवस्थेला फटका बसला असून अनेक कंपन्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी चिनी सरकार गतीने काम करीत आहे. बीजिंगमधील एका कंपनीचे मार्केटींग मॅनेजर झांग लिझू म्हणाले की ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे नुकसान आहे. आम्हाला आशा आहे की चीन जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था होईल.
चीनमध्ये जरी गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरी, चीनमधील लाखो लोकांचे उत्पन्न खूपच कमी आहे. चीनमध्ये ५५ लक्ष ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखालील आपले आयुष्य जगात आहेत. चीनमध्ये वार्षिक ३२६ डॉलर उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना लोकांना दारिद्र्य रेषेखालील समजले जाते.
चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे चिनी सरकारवर दबाव वाढला आहे. त्यामुळे चिनी सरकार आणि सामान्य नागरिकांमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. चीन सरकारने बेरोजगार, कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचा चीनने प्रयत्न केला आहे. चीनमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान 5 दशलक्षाहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.