भुवनेश्वर –रविवार झालेल्या दुसऱ्या व एकूण चौदाव्या सामन्यात मुंबई खिलाडीज व राजस्थान वॉरियर्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई खिलाडीजने राजस्थान वॉरियर्स वर ३१-३० (मध्यंतर १४-१३) असा १ गुणाने निसटता विजय मिळवला.
After multiple setbacks, it’s time for their comeback 💪💯#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/PAAhdXjH4R
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) December 31, 2023
या सामन्यात राजस्थान वॉरियर्सच्या विजय हजारेने उत्कृष्ट संरक्षण केले. तर वृषभ वाघने ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला तर मुंबईच्या पी. शिवा रेड्डीने ४ गुण मिळवून दिले. दुसऱ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसच्या हृषिकेश मुर्चावडेने जवळजवळ १.५0 मि. संरक्षण केले, प्रतिक देवारे व सिबीन एम यांनी ड्रीम रन्सचे २ गुण मिळवले. मध्यंतराला मुंबईने १४-१३ अशी १ गुणाची निसटती आघाडी घेतली होती.
Ultimate Kho Kho Season 2 : तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर निसटता विजय…
दरम्यान, याच स्पर्धेत याआधीच्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर 1 गुणाने (29-28) निसटता विजय मिळवला, हा सामना अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. रविवारच्या सामन्यात दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.