भुवनेश्वर – रविवार झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने ओडिशा जगरनॉट्सवर १ गुणाने (29-28) निसटता विजय मिळवला, हा सामना अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. रविवारच्या सामन्यात दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
𝐎𝐧𝐞 𝐩𝐨𝐢𝐧𝐭 and these two sides, an eternal love story 🤯🙌#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/yma3Fybiur
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) December 31, 2023
कालपर्यंत झालेल्या बाराव्या सामन्यापर्यंत चेन्नई क्विक गन्सचा रामजी कस्यप १०.२३ मि. संरक्षण, ४० गुणांसह संरक्षण, आक्रमणात तसेच आकाषीय सूर मारण्यात (१२ वेळा) व सूर मारून बाद करण्यात (२६ गुण) अल्टीमेट खो-खो सीझन २ सध्या प्रथम क्रमांकावर आहे. चेन्नईचाच दुर्वेश साळुंके वजीर म्हणून २४ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. स्तंभात खेळाडू बाद करणे या प्रकारात मुंबई खिलाडीसचा अनिकेत पोटे (६ वेळा), सहज स्पर्शाने बाद करण्यात मुंबईचाच गजानन शेंगाळ (२० गुण) प्रथम क्रमांकावर आहे.
रविवारी झालेल्या तेराव्या सामन्यात तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर २९-२८ (मध्यंतर १४-१५) असा विजय मिळवला. गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सला मध्यंतराला मिळालेल्या एक गुणाची आघाडी कामी आली नाही. ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलुगू योद्धासला आक्रमणासाठी आमंत्रित केले. पहिल्या टर्नमध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या ओंकार सोनवणे १.२० मि संरक्षण दिपेश मोरे १.४० मि. संरक्षण व बी. निखीलने ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला, रोहन शिंगाडेने (१.२२ मि. संरक्षण) ड्रीम रन्सचे १ गुण मिळवून दिला, तर तेलुगू योद्धासच्या रुद्र थोपटेने ६ गुण मिळवले. तर दुसऱ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकर १.५५ मि. संरक्षण, आदित्य गणपुले २.२६ मि. संरक्षण व ड्रीम रन्सचे ४ गुण मिळवून दिले, ४.४२ मिनिटात पहिली तुकडी बाद झाली. अवधूत पाटील व ध्रुवचे संरक्षण उत्कृष्ट झाले. तर ओडिशाच्या गौतम एम के व दिपक साहूने चार-चार गुण मिळवून दिले.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या अविनाश देसाईचे एक मि. पेक्षा जास्त संरक्षण केले. तर पहिली तुकडी अडीच मिनिटात बाद झाली. तर दुसरी तुकडी १.१५ मिनिटात बाद झाली. तर तेलुगू योद्धासच्या प्रतिक वाईकरने आक्रमणात ६ गुण मिळवले. तर शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या किरण वसावेने १.२० मि. संरक्षण केले, अरुण गुणकीने एक मि. पेक्षा जास्त संरक्षण करून ड्रीम रन्सचा १ गुण मिळवून दिला. प्रसाद राडियेने दीड मिनिटा पेक्षा जास्त संरक्षण केले. या सामन्यात प्रतिक वाईकरला उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुले उत्कृष्ट संरक्षक तर दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सोमवारी पहिला सामना गुजरात जायंट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धास यांच्यात रंगेल.