भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ चा अंतिम महामुकाबल्यात गुजरात चेन्नई क्विक गन्सचा ३१-२६ असा ५ गुणांनी दणदणीत पराभव करून खऱ्या अर्थाने जायंट्स ठरली. गुजरातच्या विजयानंतर कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
विजेत्या गुजरात जायंट्सला रु. एक करोड व चषक, उपविजेत्या चेन्नई क्विक गन्सला रु. पन्नास लाख व चषक तर तृतीय क्रमांकाच्या ओडिशा जगरनॉट्सला रु. तीस लाख व चषक देऊन गौरवण्यात आले. आजच्या सामन्यामध्ये सुयश गरगटेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
What a breathtaking final as the @GiantsKho held their nerves in the last moments to emerge victorious 🤩#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/Fo6epmRIZ8
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 13, 2024
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्स ला आक्रमणा साठी आमंत्रित केले. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सला २९-१० असे १९ गुणांची आघाडी घेत २० गुणांचे आव्हान दिले होते तर गुजरात जायंट्सनेला अजून ड्रीम रन्स वाढवण्याचे लक्ष होते. गुजरातच्या पहिल्या तुकडीतील तीनही खेळाडू सव्वा मिनिटात बाद करत धुव्वाधार आक्रमणाचे प्रदर्शन केले ६ गुण वसूल केले.
Ultimate Kho Kho Season 2 : गुजरात प्रथमच अंतिम फेरीत; गतविजेत्या ओडीशावर केली मात
दुसऱ्या तुकडीला एकूण ३.१८ मिनिटात बाद करत ६ गुण म्हणजे एकूण १२ गुण मिळवत जोरदार मुसंडी मारत चेन्नई क्विक गन्सने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू लवकर बाद झाले मात्र शेवटी संकेत कदमने नाबाद राहत विजयाला गवसणी घातली व त्याने ड्रीम रन्सचे २ गुण सुध्दा मिळवून दिले व त्यानंतर गुजरातच्या पाठीराख्यांनी मैदानात एकच जल्लोष केला.