Telugu Yoddhas vs Gujarat Giants (Bhubaneswar) :- अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलगू योद्धाजला वीस गुणांनी पराभवाच्या खाईत लोटले. हे सामने कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरु आहेत. आजच्या सामन्यामध्ये राम मोहनला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Gujarat jump to the 🔝 of the points table after that giant win 🙌🏼#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/Wl9TeU0hPV
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 8, 2024
गुजरात जायंट्सने तेलगू योद्धाजला ४२-२२ (मध्यंतर १९-१२) असे वीस गुणांनी पराभवाच्या खाईत लोटले. गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलगू योद्धाजला आक्रमणासाठी आमंत्रित केले. सात मिनिटांच्या पहिल्या टर्नमध्ये तेलगू योद्धासजने पहील्यांदाच पॉवर प्लेने सुरवात केली. गुजरात जायंट्सच्या पहिल्या तुकडीतील विनायक पोकार्डेला (१.२५ मि. संरक्षण) अरुण गुणकीने, अक्षय भांगरेला (१.२२ मि. संरक्षण) वैभव निपाणेने आकाशीय सूर मारत बाद केले मात्र यापूर्वी अक्षयने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. पहिल्या टर्न नंतर तेलगू योद्धासने ८-५ अशी ३ गुणांची आघाडी घेतली.
दुसऱ्या टर्न मध्ये गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनी दमदार आक्रमण सुरु केले व तेलगू योद्धाजवर आघाडी घेतली. मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये पहिल्या टर्नमध्ये तेलगू योद्धाजने पहील्यांदाच पॉवर प्लेने सुरवात केली. या टर्नमध्ये दोन्ही संघांनी २२-२२ असे गुण फलकावर लावले होते. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलगू योद्धाजच्या पहिल्या तुकडीतील प्रेम रणदिवे पबनी साबरने सहज स्पर्शाने बाद केले, काही क्षणातच वैभव निपाणेला विनायक पोकार्डेने सूर मारत बाद केले, तर रुद्र थोपटेला अर्णव पाटणकरने सुध्दा सूर मारत बाद केले व पहिली तुकडी १.४७ मिनिटात बाद झाली.
Ultimate Kho Kho Season 2 : मुंबई खिलाडीजची पुन्हा राजस्थानवर मात….
दुसऱ्या तुकडीतील रजत मलिकला विनायक पोकार्डेने सहज स्पर्शाने व मतलुमला अर्णव पाटणकरने तर अनुकुल सरकारला व्ही सुब्रमणिने सूर मारत बाद केले व हि तुकडी एकूण २.४० मिनिटात बाद झाली. तिसऱ्या तुकडीतील बोज्जम रंजीतला व्ही सुब्रमणिने सहज स्पर्शाने, महंमद मोमीनला विनायक पोकार्डेने सूर मारत बाद केले तर एम फणी कुमारला व्ही सुब्रमणिने सहज बाद केले. चौथ्या तुकडीतील अर्जुन बिशुकर्माला व्ही सुब्रमणिने सूर मारत बाद केले व गुजरात जायंट्सने तेलगू योद्धासला ४२-२२ असे २० गुणांनी पराभवाच्या खाईत लोटले.