भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई खिलाडीजने राजस्थान वॉरियर्सवर २ गुणांनी चुरशिच्या सामन्यात विजय मिळवला. हे सामने कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरु आहेत.या सामन्यामध्ये गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सामन्यातून कोणताही संघ उपांत्य फेरीत पोहचू शकणार नाही.
मुंबई खिलाडीजने पुन्हा एकदा राजस्थान वॉरियर्सचा २९-२७ (मध्यंतर १७-१२) असा दोन गुणांनी पराभव केला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व मुंबई खिलाडीजला आक्रमणासाठी आमंत्रित केले. सात मिनिटांच्या पहिल्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसने पहील्यांदाच पॉवर प्लेने सुरवात केली यात दोन वजीर घेऊन खेळू शकतो व वजीर कधीही कोणत्याही बाजूला जाऊ शकतो.
Khiladis hold their nerve in the last minutes as the Warriors face yet another heartbreak 💔#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/W5IH87XVg8
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 7, 2024
राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीतील सतेज पाटीलला सुभासिस संत्राने सहज बाद केले, वृषभ वाघला एस. श्रीजेशने सहज बाद केले व विजय हजारेने ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. दुसऱ्या तुकडीतील जगन्नाथ मुर्मूला गजानन शेंगाळने स्तंभात बाद केले. दिलराजसिंग सेंगरला एस. श्रीजेशने सहज स्पर्शाने बाद केले व मुंबईने १०-३ अशी अवघी ७ गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या खेळाडूंनी दमदार आक्रमण सुरु केले व मध्यंतराला मुंबईवर १७-१२ अशी ५ गुणांची आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीतील सौरभ गाडगेला गजानन शेंगाळने आकाशीय सूर मारत बाद केले व मुबंईची आघाडी वाढवली. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने २६-१७ असे १० गुणांचे आव्हान राजस्थान वॉरियर्सला दिले. गजानन शेंगाळला मजहर जमादारने सहज बाद केले, एस. श्रीजेशला निलेश पाटीलने बाद सहज बाद केले पण त्यापूर्वी ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवले व पी. शिवा रेड्डी नाबाद राहिला व राजस्थान जिंकत असलेला सामना मुंबईने संरक्षणाच्या जोरावर ३ ड्रीम रन्स मिळवल्याने २९-२७ असा दोन गुणांनी जिंकला.