लंडन – जागतिक फुटबॉल क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जात असलेल्या युरोपमधील मुख्य फुटबॉल स्पर्धा म्हणून गणल्या जात असलेल्या यूएफा चॅम्पियन लीगच्या रचनेत यंदापासून बदल होणार आहेत. नव्या रचनेनूसार 32 ऐवजी 36 संघ सहभागी होणार आहेत.
पारंपरिक आराखड्यानुसार या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत होते. या सर्व संघांची 8 गटांत विभागणी होत होती. एक संघ 6 साखळी सामने खेळत होता. त्यानंतर प्रत्येक गटात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोन संघांना बाद फेरीत प्रवेश मिळत होता.
उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यांनंतर अंतिम लढतीसाठी संघ निश्चित होत होते. आता नव्या नियमानुसार अंतिम सामना खेळणारा संघ संपूर्ण स्पर्धेत एकूण 17 सामने खेळेल. या महिन्यात यूएफा फुटबॉल समितीची बैठक होणार असून त्यात या नव्या रचनेला मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे.
स्पर्धेच्या नव्या आराखड्यात सहभागी होत असलेल्या 36 संघांना 5 होम व 5 अवे सामने खेळावे लागणार आहेत. उप उपांत्यपूर्व फेरीत 16 संघ असतील. सर्व संघ प्रत्येकी 10 सामने खेळल्यानंतर त्यातील सर्वाधिक गुण मिळवणारे 8 संघ थेट बाद फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यांनंतर अंतिम सामना होईल