UEFA Champions League 2023/24 : मँचेस्टर सिटीने दुसऱ्या लेगमध्ये कोपनहेगनचा 3-1 असा पराभव करत सलग सातव्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मँचेस्टर सिटीने पूर्वार्धात आघाडी घेतली होती. नऊ मिनिटांत मॅन्युएल अकांजी (05वे मिनिट), ज्युलियन अल्वारेझ (09वे) यांनी दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. तिसरा गोल एर्लिंग हालैंडने (45+3) केला. सर्व टूर्नामेंटमधील हा त्याचा 29 वा गोल होता. कोपनहेगनसाठी एकमेव गोल इलिओनोसीने 29व्या मिनिटाला केला.
WPL 2024 ( #UPWvMI Match 14 ) : मुंबईने घेतला मागील पराभवाचा बदला, यूपीचा 42 धावांनी केला पराभव…
नॉर्वेचा एर्लिंग हालैंडआता सहा गोलांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. हॅरी केन आणि केलियन एमबाप्पेसह तो संयुक्तपणे बरोबरीत आहे. यावेळी चॅम्पियन्स लीगच्या दावेदारांमध्ये मँचेस्टर सिटीचा समावेश आहे. त्याच्यासह इंटर, आर्सेनल आणि रिअल माद्रिद हे दावेदार आहेत.