Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray । ’अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचं पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीही झुकला नाही. आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते, ती यांच्यासमोर झुकणार.
आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो’ अस म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर ऑफर दिली. । Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray
दरम्यान, त्यांच्या या ऑफरवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिल आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देतो. भाजपात या, तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ. मी आत्महत्या करेन पण भाजप सोडणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे अशा प्रकारची विधान करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर त्यांनी विचार करावा. गडकरी राष्ट्रीय संपत्ती आहेत. सर्वपक्षीय नेते त्यांचं कौतुक करतात. उद्धव ठाकरेयांनी तसं करू नये”. असं ते म्हणाले. । Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘निवडणूक होईल, घाई कशाची आहे? आपल्याकडे देखील निवडणूक बाकी आहे. अशी विधाने करुण आमच्यासाठी सत्ता हेच सर्वतोपरी आहे हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलय. अगोदर त्यांनी ‘मविआ’त सर्वात जास्त जागा कोण लढवले हे ठरवावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना केले. । Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray