Motilal Oswal Trophy : स्नुकर स्पर्धेत सुरज, अभिजीत उपांत्यपूर्व फेरीत…

पुणे :- डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत रानडे आणि सुरज राठी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत अभिजीत रानडे याने डेक्कन जिमखानाच्या समर खंडेलवाल याच्यावर ६९-३५, ३०-४१, ६३-२६, ४८-३१ असा सहज विजय मिळवला.
पुना क्लबच्या सुरज राठी याने आपलाच क्लबसहकारी विग्नेश संघवी याच्यावर ८९-२८, ६९-००, ५९-२० असा सरळ फ्रेममध्ये विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरी गाठली. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये कैवल्य जाधव याने अभिजीत मोरे याचा ४१-२४, २८-४१, ७४-१६, १२-२७, ७९-४२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. महेश जगदाळे याने नितेश माने याचा ६३-३६, १९-४७, ५८-२७, ४७-०० असा पराभव करून आगेकूच केली.
Indian Open Snooker Tournament : आरव, विजय, अमरदीप अंतिम 16 खेळाडूत….
आनंद रघुवंशी याने लियाकत शेख याचा ५५-१७, ४७-००, २६-६७, ३९-१२ असा पराभव करून उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली. अमोघ बंदीचोडे याने अभिषेक लोखंडे याच्यावर ५१-३५, १४-३८, ८५-१०, ४४-०९ असा विजय मिळवला. अश्विन पळणीटकर याने बापू गायकवाड याच्यावर ६१-३६, ३३-१९, ६२-२६ असा सरळ फ्रेममध्ये विजय मिळवत उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली. ज्युनिअर गटामध्ये आयान खान याने सलग दोन विजय मिळवले. ओवेस शेख, राजवीर राजाध्यक्ष, आर्यन मारभाल आणि आरव संचेती यांनीसुद्धा विजयी कामगिरी करून स्पर्धेत आगेकूच केली.





