मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 8 जून रोजी राज्यातील मराठवाडा विभागात जाहीर सभा घेणार आहेत, त्याच्या आधी ते 14 मे रोजी मुंबईत एक रॅली घेऊन मुंबई महापालिकेच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत. सभेचे ठिकाण आणि इतर तपशील ठरवला जात आहे असे शिवसेनेने शुक्रवारी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका सध्या प्रशासकाच्या अधिपत्याखाली आहे कारण या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या तेथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबईच्या सभेसोबतच मुख्यमंत्री मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जाहीर मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
मराठवाड्यातील ही सभा औरंगाबादला होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या आरोपांना आपणही जाहीर सभा घेऊन उत्तर देणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच नमूद केले होते. त्यानुसार त्यांच्या 14 मे आणि 8 जूनच्या सभा निश्चीत करण्यात आल्या आहेत.