‘उद्धव ठाकरेंनी राहुल यांना भर चौकात फोडून काढावे’

सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांचं आवाहन 

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. जर कोणी वीर सावरकरांचा अपमान केला तर त्याला भर चौकात फोडून काढू, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अनेकदा म्हणाले आहेत. आता त्यांनी राहुल गांधींनी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्यांना भर चौकात फोडून काढावे, असं आवाहन वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

Ranjeet, Veer Savarkar’s grandson, on Shiv Sena joining hands with NCP-Congress: As far as I know Uddhav ji, he won’t ever leave his Hindutva ideology&back off from demand of Bharat Ratna to Veer Savarkar for power. I’m confident,Shiv Sena will change Congress’ stance on Hindutva pic.twitter.com/XYeCGjE8Vc

— ANI (@ANI) November 15, 2019

रेप व इंडिया या विधानावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. त्यावर उत्तर देताना ‘मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माफी मागायला मी कुणी राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे,’ असं वादग्रस्त विधान राहुल गांधींनी केलं होत. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करत राहुल गांधींचे कां टोचले आहेत.  त्यानंतर आता राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत रणजीत सावरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे बोलताना रणजित सावरकर म्हणाले, ‘राहुल गांधींचं नाव राहुल सावरकर नाही, ही चांगली गोष्ट आहे, अन्यथा आम्हा सर्व सावरकरांना तोंड काळं करून फिरावं लागलं असतं. आज राहुल यांनी सातत्याने सावरकरांवर ब्रिटीशांची माफी मागितल्याचे आरोप केले. पण सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. त्यांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली होती, हे जगजाहीर आहे. सावरकरांनी अटी मान्य केल्या पण कधीही ब्रिटीश राजनिष्ठेची शपथ घेतली नाही, जी पंडित नेहरुंनी घेतली होती,’ अशा शब्दात वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)