‘बालाकोट स्ट्राइक’ मोठ्या पडद्यावर; संजय लीला भन्साळी यांची घोषणा

मुंबई – काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय जवान मरण पावले आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर बारा दिवसानंतर भारतीय वायुसेनेने भारत-पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या छावण्यांवर बॉम्ब्सचा वर्षाव केला.

दरम्यान, या हल्ल्याचा थरार आता रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांनी नुकतंच आपण या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची अधीकृत घोषणा केली आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच हिट होईल यात काही शंका नाही. कारण बॉलीवूड मधील देशभक्ती आणि राष्ट्रवादाची पार्श्वभूमी असलेले चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.