Madhya Pradesh Congress| महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभाची उमेदवारी देखील देण्यात आली आहे. यानंतर आता मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि माजी खासदार गजेंद्र राजुखेडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे.
सुरेश पचौरी यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुरेश पचौरी यांनी भोजपूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते दोन्ही वेळा भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते.
पचौरी पाठोपाठ संजय शुक्ला, विशाल पटेल, माजी आमदार अर्जुन पालिया, माजी आमदार अर्जुन पालिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गजेंद्र सिंह राजुखेडी यांनी देखील काँग्रेसचा हात सोडला आहे. राजुखेडी हे 1998 ते 2004 पर्यंत खासदार होते.त्यानंतर 2009 ते 2014 पर्यंत ते खासदार होते. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेतही ते सहभागी झाले नाहीत. Madhya Pradesh Congress|