सातारा- मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा नाहीतर परिणामांना सामोरे जा, अशी आक्रमक प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत ही भूमिका घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.https://t.co/iQ8iYCpLLP pic.twitter.com/pSKdYnQBz5
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020
सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असंही ते म्हणाले.
मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. pic.twitter.com/G0HVeDqxwa
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020
मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे,असेही ते पुढे म्हणाले. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन आता नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 11, 2020