India U19 vs USA U19 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ रविवारी (28 जानेवारी) अ गटातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. ब्लोमफॉन्टेनमध्ये भारतासमोर अमेरिकेचे आव्हान आहे. भारतीय संघाने सुपर 6 मध्ये आधीच स्थान पक्के केले आहे, त्यामुळे अमेरिकेचा प्रवास संपला आहे.
अमेरिकेने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 5 विकेट गमावत 326 धावा केल्या आहेत. अमेरिकेला विजयासाठी 327 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
Innings Break!#TeamIndia post 326/5 in the first innings.
💯 from Arshin Kulkarni
73 from Musheer KhanOver to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/OAbsdAHOj5#BoysInBlue | #INDvUSA pic.twitter.com/yfxSdL8HWY
— BCCI (@BCCI) January 28, 2024
भारताकडून फलंदाजीत अर्शीन कुलकर्णीने 118 चेंडूत सर्वाधिक 108 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकार मारले. मुशीर खानने 76 चेंडूत 73 धावांची खेळी केली. कर्णधार उदय सहारनने 35 धावा केल्या. प्रियांशू मोलिया 27 धावा करून नाबाद राहिला. आदर्श सिंगने 25 तर सचिन धसने 20 धावा केल्या.
अमेरिकेकडून गोलंदाजीत अतिंद्र सुब्रमण्यमने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर आरीन नाडकर्णी, आर्य गर्ग आणि ऋषी रमेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.