डर्बन : फलंदाजीत प्रियम गर्गने केलेल्या शतकी खेळीनंतर गोलंदाजीत सुशांत मिश्राने केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील गटाच्या चौरंगी क्रिकेट मालिकेतील पहिल्या वन-डे लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ६६ धावांनी पराभव करत विजय साकारला आहे. प्रियम गर्ग सामन्याचा मानकरी ठरला.
#SAu19s | That’s it at the Chatsworth Oval. India seal a 66-run victory against #SAu19s.
Captain, Priyam Garg was named the Man of the Match for his crucial 110 with the bat. #U19QuadSeries #SAvIND pic.twitter.com/25VIOmDF1y
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 3, 2020
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद २६४ धावा केल्या होत्या. यामध्ये प्रियम गर्गने १०३ चेंडूत ११० धावांची खेळी केली तर ध्रुव जुरेल याने ६५ आणि तिलक वर्माने ४२ धावा केल्या. द.आफ्रिकेकडून गोलंदाजीत मोंडली खुमालो याने ५३ धावांत ४ तर क्लोएटने ४५ धावांत १ गडी बाद केला.
#SAu19s | End of innings. India’s skipper, Garg top-scored with 110 as the visitors posted a competitive 264/5 in 50 overs.
Mondli Khumalo was the chief wicket-taker for SA, with career-best #YouthODI figures of 4/53.
South Africa need 265 to win. #FutureStars #U19QuadSeries pic.twitter.com/HRw7rUMWMG
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 3, 2020
विजयासाठी २६५ धावांचा पाठलाग करताना द.आफ्रिकेच्या संघाला ५० षटकांत ९ बाद १९८ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. द. आफ्रिकेकडून फलंदाजीत ब्रायस पर्सन्सने ५७ तर अँण्ड्रयू लोवने ४५ धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ४८ धावा देत ४ तर रवी बिश्नोईने २९ धावा देत २ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले.
#SAu19s | Update – SA: 184/9 after 47 overs. Target 265. Khumalo 5* Cloete 5*; Bishnoi 1/29#SAvIND #U19QuadSeries
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 3, 2020
दरम्यान , या चौरंगी मालिकेत भारत, द. आफ्रिकेशिवाय न्यूझीलंड आणि झिम्बाब्बे संघाचा समावेश आहे. भारताची पुढील लढत रविवारी झिम्बाब्वे संघाशी होणार आहे.