पुणे : खासगी बसने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू आणि दोघे जण जखमी झाल्याची घटना वंदावन गोशाळेजवळील डोंगराचे उतारावर गुजर निंबाळकर वाडी खोपडेनगर कात्रज येथे घडली आहे.
गणेश जगदिश चोकला ( वय २३, रा. हडपसर), गिरधारीलाल जयाराम जाट (वय-३६ , रा. नानानगर सिंहगड रोड) असे बस च्या धडकेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अर्जुन जुजाराम देवाशी (वय २३, रा. नेहरुनगर पिंपरी चिंचवड), प्रविण पल्हादराव प्रजापती (वय २३, रा. शिवराजचौक कोढवा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी बस चालक किरण रविंद्र महादे (वय-२९ रा. खडकवासला) याच्यवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, अर्जुन जुजाराम देवाशी (वय-२३) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसता, ही घटना 15 जानेवारी रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली. बस चालक किरण महादे याने हाईगईने व बेदरकारपणे चालवुन ज्युपिटर दुचाकील धडक देवून व तसेच पायी चालणा-या इसमाना धडक दिली.
यात गणेश जगदिश चोकला आणि गिरधारीलाल जयाराम जाट यांचा मृत्यू झाला तर अर्जुन जुजाराम देवाशी,न प्रविण पल्हादराव प्रजापती हे जखमी झाले. याप्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.