कोल्हापूर – कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील बाजारपेठ, सरकारी कार्यालय परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलीसांना यश आलयं. संशयित आरोपी सुरेश कृष्णमूर्ती शेट्टी (वय ३५, रा. व्यंकटेश पार्क मुडशिंगी, ता. करवीर) आणि त्याचा साथीदार मायाप्पा शिवाप्पा कोळी (२५, रा. पाटील मळा, करोली, ता. मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडून पाच लाख किंमतीच्या १५ दूचाकी हस्तगत केल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बोलताना दिली.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात दूचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस ठाण्यात रोज किमान दोन-तीन गुन्हे दाखल होत असत. पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दूचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलीस अंमलदार सोमराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दूचाकी चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश शेट्टी हा चोरीची दूचाकी विक्री करण्यासाठी कोल्हापूरातील झेवीयर्स हायस्कूल कसबा बावडा रोड रमणमळा परिसरा येणार आहे. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले व त्यांचे पथकातील वसंत पिंगळे, कृष्णात पिंगळे, हिंदुराव केरारे, दिपक घोरपडे व सोमराज पाटील यांनी रमणमळा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी सुरेश शेट्टी याला ताब्यात घेतलं.
त्याचेकडे नंबर नसलेली दूचाकी मिळून आली. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता साथीदार मायाप्पा कोळी याचे मदतीने आणखी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघा चोरट्यांना अटक करुन त्यांचे ताब्यातून चोरीच्या १५ दूचाकी हस्तगत केल्या.