एक पत्राने मंत्र्याची चौकशी कशी होऊ शकते : बाळासाहेब थोरात

मुंबई  – चौकशीच्याबाबतीचा निर्णय झालेला नाही, तर तसा विषय येतो कुठं? आम्ही या विषयात इतकं पुढं गेलोच नाही. एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकते? भाजप शेवटी विरोधी पक्षात आहे. सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांचा सतत प्रयत्न सुरु असतो, जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्माण करण्याकरता त्यांना ती संधी वाटत आहे. फक्त सत्तेसाठी चाललेला त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला महसूल मंत्री आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगाविला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकेल्या गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावरुन सध्या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, काही प्रश्न असे आहेत की, ज्याचं उत्तर मी देण्याची आवश्‍यकता नाही.

त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांनीच माहिती देणे योग्य आहे.राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे म्हणण्याचे काही कारण नाही. कारण याआधी युती सरकारचा कालखंड होता, त्या काळात देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी, अनेक प्रश्न निर्माण होत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.