तैपैई – तैवानने जर चीनकडून करोनाची लस आयात केली तर आम्ही ती लस घेणार नाही, असे तैवानमधील 67 टक्के लोकांनी जाहीर केले आहे. तर उर्वरित लोकांनी मात्र चीनची लस घेण्यास होकार दर्शवला आहे.
तैवान टाइम्सने एका सर्वेच्या आधारावर हे वृत्त छापले आहे. त्यानुसार ज्या 67 टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला आहे, त्यातील 27.1 टक्के लोकांनी चीनची लस नकोच असे म्हटले आहे. तर याच 67 टक्क्यांपैकी 39.9 टक्के लोकांनी कोणत्याही किमतीत किंवा काहीही झाले तरी आम्ही चीनकडून आयात केलेली लस घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.
चीनने लस, तिच्या चाचण्या आणि त्यातून निष्पन्न झालेली आकडेवारी यासंदर्भात कोणतीही माहिती उघड केलेली नाही, हेच लस नाकारण्यामागचे मुख्य कारण असल्याचे एका विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.