मुंबई – चंद्र आणि सूर्यग्रहण ही दोन्ही खगोलीय घटना आहेत जी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या स्थितीमुळे उद्भवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि चंद्रग्रहणांना विशेष महत्त्व आहे. या काळात शुभ कार्य आणि पूजा करण्यास मनाई आहे. ज्योतिषींच्या मते, २०२४ मध्येही चार ग्रहण दिसणार आहेत. यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होतील.
८ एप्रिलला पहिले सूर्यग्रहण
पहिले सूर्यग्रहण सोमवार, दि. ८ एप्रिल रोजी होणार आहे परंतु ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचे कोणतेही धार्मिक महत्त्व राहणार नाही आणि त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतच दिसणार आहे.
सूर्यग्रहणाची वेळ : रात्री ९.१२ ते१.२५ मध्यरात्री.
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी : ४ तास २५ मिनिटे
2 ऑक्टोबरला दुसरे सूर्यग्रहण
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबरला होणार आहे. हे देखील भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण हे कंकणाकृती असेल. हे घडते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो, परंतु त्याचे अंतर पृथ्वीपासून दूर असते.
चंद्र पृथ्वीपासूनच्या अंतरामुळे लहान दिसतो. या सूर्यग्रहणाचा बहुतांश मार्ग पॅसिफिकमध्ये असेल. दक्षिण आफ्रिका, चिली आणि अर्जेंटिनामध्ये हे स्पष्टपणे दिसेल.
सूर्यग्रहण वेळ : रात्री ९.१३ आणि ३.१७ मध्यरात्री
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी : ६ तास ४ मिनिटे
२५ मार्च रोजी पहिले चंद्रग्रहण
नवीन वर्षातील पहिले ग्रहण चंद्रग्रहण २५ मार्च रोजी होणार आहे. हे ग्रहण खग्रास चंद्रग्रहण असेल आणि त्याचा वेध कालावधी देखील वैध नसेल. या काळात चंद्र केवळ पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील कडांमधून जातो. या काळात ग्रहण खूपच कमकुवत असेल, त्यामुळे पूर्ण किंवा आंशिक ग्रहणाच्या तुलनेत उघड्या डोळ्यांनी पाहणे कठीण होईल.
युरोप, ईशान्य आशिया, ऑस्ट्रेलियाचा मोठा भाग, आफ्रिकेचा काही भाग, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दृश्यमान असेल. याशिवाय पॅसिफिक महासागर, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही ते दिसणार आहे.
चंद्रग्रहण वेळ : सकाळी १०.२३ ते दुपारी३.२ मिनिटे
चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी : ४ तास ३६ मिनिटे
१८ सप्टेंबर रोजी शेवटचे चंद्रग्रहण
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. ते युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये देखील दृश्यमान असेल. या ग्रहणादरम्यान चंद्राचा फक्त एक छोटासा भाग खोल सावलीत प्रवेश करेल.
चंद्रग्रहणाची वेळ : सकाळी ६.१२ ते १०.१७ पर्यंत
चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी : ४ तास४ मिनिटे