औरंगाबाद – औरंगाबाद इथे करोनाची बाधा झालेले दोन कैदी कोविड सुश्रुषा केंद्रातून पसार झाले आहेत. सय्यद सैफ सय्यद असद आणि अक्रमखान अयाजखान अशी या दोघांची नावे आहेत.
दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत असलेल्या या दोघा कैद्यांनी रविवारी पलायन केले, सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हे दोघे पसार झाल्याचे मध्यवर्ती कारागृहाकडून सांगण्यात आले आहे.
या दोन्ही कैद्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असून, नियंत्रण अधिकाऱ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.