नवी दिल्ली : देशभरात एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे तर दुसरीकडे आसामच्या दिब्रूगड येथे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोन ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत. दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला करत बंडखोरांनी स्फोट घडवून आणला असल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी पहिला स्फोट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जवळ झाला तर दुसरा स्फोट दिब्रूगडमधील एका गुरुद्वारा जवळ झाला. केवळ अर्ध्या तासाच्या आतमध्येच हे दोन स्फोट झाले.
Assam DGP Bhaskar Jyoti Mahant: We have received the information about the explosion in Dibrugarh. An investigation has begun, it is being probed that who is involved in this. https://t.co/jIIToDOLlZ
— ANI (@ANI) January 26, 2020
दरम्यान, या स्फोटांमागे आसाममधील बंडखोर संघटना युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असाम-इंडिपेंडंट (उल्फा-आय) या संघटनेचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या बंदी असलेल्या संघटनेने आसामच्या जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. सर्वसाधारणपणे अशा संघटना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच बंदचे आवाहन करीत असतात, असेही पोलिसांनी म्हटले आहे.