पिंपरी – संचारबंदीच्या काळात दारूची खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नवी सांगवी येथे घडली.
मजीबुल शुकुर शेख (वय 24, रा. नवी सांगवी), रोहित अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई सुरेश जायभाये यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी शेख याने विक्रीसाठी मद्यसाठा ठेवला. नागरिकांनी त्याच्याजवळ गर्दी केली. याबाबत शेख व त्याला दारु पुरविणाऱ्या रोहितवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 96 बिअरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा 17 हजार 40 रुपयांचा माल जप्त केला आहे.