ठाणे: ठाण्यात रविवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघा किशोरवयीन मुले ठार झाल्याची दुर्घटना घडली. हा अपघात घोडबंदर रस्त्यावर सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडला. मानपाडा येथील दोन किशोरवयीन मुले स्कुटरवरून जात असताना एका अज्ञात वाहनांने त्यांना जोराची धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी परिसरात शनिवारी रात्री भरधाव वाहनाची झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.