तलवारीच्या धाकाने वृत्तपत्रविक्रेत्यास लूटणारे दोघे जेरबंद

पुणे – तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्यास लूटणाऱ्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. पैशाची चणचण असल्याने त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. गौरव उर्फ लाल्या सुहास फडणीस (30. रा.पर्वती) आणी अक्षय उर्फ पप्पू कैलास गरुड(22,रा.व्हिआयटी कॉलेज मागे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वृत्तपत्र विक्रेते शंकर खुटवड हे गुरुवारी लक्ष्मीनारायण थिएटरजवळील पुलाखाली बसले होते. त्यांच्याकडे वृत्तपत्र विक्रीतून जमा झालेली 90 हजार 300 रुपयांची रोकड होती. यावेळी दुचाकीवरुन आरोपी ट्रीपल सीट आले. मागे बसलेल्याने त्यांच्याकडील पैसे असलेली शबनम जबरदस्तीने हिसकावत पळ काढला. तेवढ्यात तेथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने पाठलाग करुन त्यांच्या दुचाकीला लाथ घातली. यामुळे तीघेही रस्त्यावर खाली पडले. वाचकाने यातील एकाला पकडून ठेवले. तेवढ्यात खुटवडही तेथे आले.

मात्र आरोपींनी चाकू आणी तलवारीचा धाक दाखवत तेथून पळ काढला. यातील एक आरोपी पडलेली दुचाकी घेण्यासाठी तेथे परत आला. त्याला खुटवड हे ओळखत होते. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे व प्रमोद भोसले यांना आरोपी पर्वती येथील लोखंडी पुलाजवळ येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानूसार सापळा रचून दोघाही आरोपींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्यासोबतच्या तीसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींवर दत्तवाडी ,बिबवेवाडी, स्वारगेट, वारजे माळवाडी तसेच ग्रामीण भागातील सासवड, घोडेगाव, सांगली आणी पौड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदल पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार राजू जाधव, पोलीस अंमलदार महेश गाढवे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, शरद राऊत, शिवाजी क्षीरसारग, राहुल ओलेकर व विष्णु सुतार यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.