गेल्या दोन महिन्यांपासून होते फरार ः पौड पोलिसांची कारवाई
पिरंगुट- खेचरे (ता. मुळशी) येथील दरोडा प्रकरणातील दोन फरार आरोपीना पौड पोलिसांनी रविवारी (दि. 17) पहाटे तीनच्या सुमारास पाठलाग करून पकडले. अजय सतीश तोंडे वय 30) व प्रफुल्ल उर्फ बाबा मल्हारी जांभोरे (वय 28, दौघे रा. खेचरे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींनी नावे आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात खेचरे येथे चोरट्यांनी दरोडा टाकला होता. तेव्हापासून गुन्ह्यातील आरोपी गेल्या महिन्यांपासून फरार होते.आरोपींच शोध घेण्यासाठी पोलीस खेचरे गावात जायचे तेव्हा आरोपींना चाहूल लागताच ते पळून जायचे. हे आरोपी गावामध्ये असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस निरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस शिपाई सुनील कदम, मयुर निंबाळकर, नाना मदने, नामदेव मोरे, गणेश साळुंखे हे आरोपींना अटक करण्यासाठी गेले. पोलीस गावात आल्याचे समजताच आरोपी बाजूच्या डोंगराच्या दिशेने पळून जात होते. मात्र, पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. अधिक तपास पौड पोलीस करीत आहे.