शिवतक्रार म्हाळुंगीतील एका युवकाला कोरोनाची लागण
तळेगाव ढमढेरे(प्रतिनिधी) : शिवतक्रार म्हाळुंगी येथील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण शिरूर तालुका हादरून गेला आहे.
शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एका चोवीस वर्षीय युवकाला काही कारणास्तव उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दहा मे रोजी दाखल केले होते. त्यांनतर त्याच्यावर सदर हॉस्पिटलमध्ये चार दिवस उपचार करण्यात आले. त्यांनतर त्याला पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असताना पुणे येथील डॉक्टरांना त्यामध्ये काही संशय आल्याने त्यांनी सदर रुग्णाची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेत त्याची तपासणी केली असताना त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे समोर आले आहे.