मंचर -रांजणी (ता. आंबेगाव) येथील शेतातील मका पिकाचे आणि बांधाचे नुकसान करून शेतात अतिक्रमण करून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जमीन मालक प्रशांत ब्रह्मे यांनी सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
प्रशांत ब्रह्मे हे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे वास्तव्यास असून, त्यांची रांजणी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. शेतीच्या देखरेखीसाठी ठेवलेल्या व्यक्तीने फोन करून शेतातील मका पिकाचे नुकसान करून रस्ता करत असल्याची त्यांना माहिती दिली.
त्यावेळी प्रशांत ब्रह्मे हे रांजणी येथील शेतावर आले असता अनिल देवराम शेजवळ, स्वप्नील अनिल शेजवळ, काजल सुमित शेजवळ, रमेश बोऱ्हाडे, छाया रमेश बोऱ्हाडे, रोहन रमेश बोऱ्हाडे (सर्व रा. गाडेकर मळा, रांजणी) हे त्यांच्या जवळील कार (एमएच 12 केवाय 2711) शेतात घालून मका पिक व बांधाचे नुकसान केल्याचे आढळले.