न्यूयॉर्क: ट्विटरला पर्याय असणारी भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट ‘कू’चे ट्विटर हँडल निलंबित केले आहे. कूचे @kooeminence हँडल ट्विटरवरून सस्पेंड करण्यात आले आहे. दरम्यान, ट्विटर एलॉन मस्क यांच्या हाती गेल्यापासून नवनवीन बदल घडून येत आहेत. त्याचा फटका युझर्सला मोठ्या प्रमाणात बसला असताना आता ट्विटरची प्रतिस्पर्धी मायक्रोब्लॉगिंग साइट कूचे ट्विटर हँडल सस्पेंड केल्याने एलॉन मस्क यांच्यावर सध्या टीका होताना पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत ट्विटरने अनेक बड्या पत्रकारांचे ट्विटर हँडल निलंबित केल्याच्या बातम्या आल्या होत्या. दरम्यान, आता यात कूचे ट्विटर हँडल सस्पेंड केल्याने कूचे सह-संस्थापक मयंक बिडवाटका यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना मयंक यांनी “मी विसरलो. इथे आणखी काही आहेत! असे ट्विट केले आहे. आता ‘तसेच “म्हणजे, या माणसाला किती कंट्रोल मिळवायचे आहे?” असा सवालही उपस्थित केला आहे.
Koo’s handle suspended on Twitter
Read @ANI Story | https://t.co/kqBSla8eEy#Twitter #Koo #ElonMusk pic.twitter.com/eU2dCpaWIR
— ANI Digital (@ani_digital) December 17, 2022
‘कु’चे अकाऊंट निलंबित केल्यानंतर त्याच्या सह-संस्थापकाने ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कु यांचे खाते निलंबित करण्यामागे काय कारण असू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे. अलीकडच्या काळात पत्रकारांची वैयक्तिक माहिती लीक केल्याच्या मस्कच्या आरोपांवरही मयंकने ट्विट केले. “जर आधीच अस्तित्वात असलेली माहिती पोस्ट करणे चुकीचे नाही. मेसेंजरला का काढून टाकायचे आहे? ज्या पत्रकारांनी लेख ऑनलाइन पोस्ट केले ते चुकीच्या कामात सहभागी नव्हते,”असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय ‘ट्विटर स्पेसेस’ बंद करण्याच्या इलॉन मस्कच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. जगातील दुसर्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा समाचार घेताना मयंक यांनी, “पत्रकारांशी चर्चेत उत्तरे न देता जागा सोडणे चुकीचे आहे. केवळ आपल्या मर्जीनुसार धोरणे बनवणे वाईट आहे. याशिवाय दररोज आपली भूमिका बदलणे चांगली गोष्ट नाही.”असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मयंक यांनी पुढे बोलताना,”ट्विटरने गेल्या आठवड्यात अशा अनेक गोष्टी केल्या आहेत, ज्या लोकशाहीत नाहीत. लोकांना आवाज उठवावा लागेल.असे म्हटले आहे. तसेच “ट्विटरला पर्याय म्हणून कूची ओळख करून देताना मयंक म्हणाले की, आजची जागा (कू) आहे. हे तुमच्यामुळे आणि लाखो वापरकर्त्यांमुळे आहे. आपल्याला या माणसाचा (एलॉन मस्क) अहंकार आणखी वाढू द्यायचा नाही. मस्क अचानक ट्विटरचा नाश करत आहे.”असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.