Twinkle Khanna: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त मुलांसह दोघेही मालदीवमध्ये फिरायला गेले होते. नुकतेच ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सायकलिंग करताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक तिचा तोल जातो आणि सायकल एका खांबाला धडकते. हे सर्व पाहून अक्षय कुमार खळखळून हसू लागतो आणि ट्विंकलही हसत असल्याचे दिसून येते. सोबतच या व्हिडीओमध्ये त्यांच्या संपुर्ण व्हॅकेशनचीही झलक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
ट्विंकलनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, ‘माझी सायकल खांबाला धडकणे सोडले तर, ही ट्रीप खूप छान अगदी खरोखरच स्वर्गात गेल्यासारखं वाटलं. तुमच्याकडे नवीन वर्षासाछी कोणतेही मोठे संकल्प असतील तर ते खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि इतरांना प्रेरणा द्या’. तिचा हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ट्विंकल खन्नाने नुकतेच तिचे चौथे पुस्तक ‘वेलकम टू पॅराडाइज’ लाँच केले आहे. सध्या तिच्या या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तो टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी 10 एप्रिल 2024 प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे.