Gold-Silver Price : नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर आहेत. मात्र, सोन्याचा भाव अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाबाहेर आहे.
GoodReturns वेबसाइटनुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६३,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६३,५७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,१४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,५९० रुपये प्रतिकिलो होती.
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५८,०८० रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६३,३६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये असेल.
नागपूर
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५८,०८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६३,३६० रुपये आहे.