– व्यंकटेश भोळा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेचा एकूण निकाल 90. 66 टक्के इतका लागला.
यंदा राज्यभरातील सुमारे 14 लाख 20 हजार 575 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 13 हजार 687 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यापैकी 12 लाख 81 हजार 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. मागील वर्षी 85.88 टक्के निकाल लागला होता. यंदा मात्र निकालाचा टक्का ४.७८ वाढला असून 90.66 टक्के लागला आहे.
यंदाही कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकणचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल लागला असून ८८.१८ टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल निकालासाठी वेबसाईट :
www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com
दि. १७ जुलै ते २७ जुलै या कालावधीत गुणपडताळणीसाठी, तर १७ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
निकालात मुलींचीच बाजी
– मुलींचा निकाल ९३.८८टक्के
– मुलांचा निकाल ८८.०४ टक्के
शाखानिहाय निकाल
– कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
– वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
– विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
– MCVC : ९५.०७ टक्के