एप्रिल पासून टीव्ही होणार महाग

ओपन - सेल पॅनेलच्या किमती वाढल्याचा परिणाम

नवी दिल्ली – टीव्हीसाठी लागणाऱ्या ओपन -सेल पॅनेलच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे एप्रिलपासून टीव्ही भारतात महाग होणार आहेत. ज्या कंपनीचे टीव्ही महाग होणार आहेत, त्यामध्ये पॅनासोनीक, हेलर, थॉमसन या कंपन्यांचा समावेश आहे. एलजीसारख्या काही कंपन्यांनी अगोदरच टीव्हीच्या किमती वाढविल्या आहेत.

लीड टीव्हीसाठी लागणाऱ्या ओपन- सेल पॅनलच्या किमती जागतीक बाजारात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणता वाढल्या आहेत. पॅनासोनीक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसापासून ओपन – सेल पॅनलच्या किमती वाढत आहेत. त्यामध्ये एप्रिल महिन्यापासून आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

टीव्हीच्या किमती किती वाढतील असे विचारले असता ते म्हणाले की पाच ते सात टक्‍क्‍यादरम्यान वाढ होण्याची शक्‍यता आहे. आवश्‍यक उत्पादनाच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला टीव्हीच्या किमती वाढविण्यात शिवाय दुसरा कसलाही पर्याय उपलब्ध नाही असे हेलर अपलान्सेस या कंपनीचे अध्यक्ष लिरिक ब्रागांझा यांनी सांगितले.

टीव्ही उत्पादनामध्ये ओपन सेल पॅनलचा भाग 60 टक्के इतका असतो. जागतिक बाजारात या भागाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपसून किमती वाढत आहेत. भारतामध्ये सध्या पॅनेलचे उत्पादन घेतले जात नाही. मात्र पुढील चार-पाच वर्षांमध्ये हे उत्पादन वाढविण्यासाठी कंपन्यांचे आणि सरकारचे प्रयत्न चालू आहेत. मात्र सध्या तरी आम्हाला दरवाढ करण्याशिवाय दुसरा कसलाही पर्याय उपलब्ध नाही.

चीन सर्वात मोठा उत्पादक
बऱ्याच वर्षापासून असा तुटवड्याचा प्रकार घडला नव्हता. भारतामध्ये सर्वसाधारणपणे 32 इंचाचे टीव्ही वापरले जातात. या टीव्हीच्या किमती मध्ये एप्रिल पासून पाच ते सहा हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. ओपन सेल पॅनलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात चीनमध्ये होते.

चीनमधून भारतात येणाऱ्या वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारताला इतर देशातून हे उत्पादन विकत घ्यावे लागते. मात्र इतर देशांमध्ये भारताच्या गरजेइतके उत्पादन नाही. त्याबरोबर इतर देश चीनमधून आयात करून ती भारताला निर्यात करण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.