Shashank Ketkar And Mrunal Dusanis| अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस ही जोडी ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेमध्ये पाहायला मिळाली होती. यातील दोघांच्याही भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच शशांक एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेता शशांक केतकरने त्याचा आणि मृणालचा एक फोटो शेअर केलेला आहे. त्या पोस्टमधून या दोघांचीही लवकरच मालिका येणार असल्याची चर्चा होत आहे. पोस्टमध्ये शशांक केतकरने लिहिलंय की, “सिद्धार्थ अनूला भेटला! मृणाल दुसानीस वेलकम बॅक… ‘हे मन बावरे’ ही मालिका संपून ४ वर्ष झाली पण, अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का ?” असं कॅप्शन शशांकने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेनंतर मृणाल दुसानिसने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. ती परदेशात नवरा आणि तिच्या मुलीसोबत राहत होती. पण चार वर्षांनी काही दिवसांपूर्वीच मृणाल भारतात परतली आहे. नुकताच तिने पती आणि लेकीसह नाशिकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. Shashank Ketkar And Mrunal Dusanis|
दरम्यान, सध्या शशांकने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शशांक-मृणालची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळणार का? अशा चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :