नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात आज 303 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 76 हजार 16 इतकी झाली आहे. आज अखेर नगर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या तब्बल 79 हजार 19 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.20 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 323 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1835 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्टलॅब मध्ये 59, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 233 आणि अँटीजेन चाचणीत 31 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 24, कर्जत 04, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 03, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 12, संगमनेर 02, कॅन्टोन्मेंट 08 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 68, अकोले 06, कर्जत 04, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 07, नेवासा 07, पारनेर 09, पाथर्डी 03, राहाता 40, राहुरी 15, संगमनेर 38, शेवगाव 06, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 06, कॅन्टोन्मेंट 02, इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 31 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, जामखेड 01, नगर ग्रामीण 03, पारनेर 02, राहाता 08, राहुरी 02, संगमनेर 02, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 107, अकोले 22, जामखेड 06, कर्जत 05, कोपरगाव 07, नगर ग्रामीण 13, नेवासा 08, पारनेर 04, पाथर्डी 11, राहाता 19, राहुरी 14, संगमनेर 53, शेवगाव 02, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 10 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:76016
उपचार सुरू असलेले रूग्ण: 1835
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1168
एकूण रूग्णसंख्या:79019