नवी दिल्ली – हमास आणि इस्रायलदरम्यान तातडीने युद्धविराम लागू करण्याच्या ठरावावर अमेरिकेकडून नकाराधिकार वापरला जाण्यावर तुर्कीयेचे अध्यक्ष इर्दोगन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त रा,ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेने या ठरावाला रोखणे अतिशय निराशाजनक असल्याची प्रतिक्रीया इर्दोगन यांनी दिली आहे.
या मुद्यावर अमेरिका एकटी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मतदानाच्यावेळी अमेरिकेने एकट्या अमेरिकेने या ठरावाला विरोध केला होता, असे तुर्कीयेचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान यांनी म्हटले आहे. इस्लामी सहकार्य संघटना आणि अरब लीगच्या देसांच्या नेत्यांबरोबरच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या संघटनेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे पररा,ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांची भेट घेतली होती.
हमासला फायदा होईल म्हणून अमेरिका आणि इस्रायल युद्धबंदीला विरोध करत आहेत. युद्ध बंदीच्याऐवजी अमेरिकेला नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणिहमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या नागरिकांच्या सुटकेसाठी तात्पुरत्या युद्धविरामाची अपेक्षा आहे.
सुरक्षा परिषद म्हणजे इस्रायल सुरक्षा परिषद नव्हे
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला इस्रायल सुरक्षा परिषद म्हणून संबोधले जाण्यालाही इर्दोगन यांनी विरोध केला आहे. दिनांक ७ ऑक्टोबरपासून सुरक्षा परिषदेने केवळ इस्रायलच्या रक्षणाचे धोरण अनुसरले आहे. अमेरिकेकडून इस्रायलला सैन्य आणि आर्थिक अशी दोन्हीची मदत केली जात आहे. मात्र इस्रायलकडून दररोज गाझामध्ये मानवादिकारांचे उल्लंघन केले जाते आहे, त्याकडे डोळेझाक केली जात आहे, अशी टीकाही इर्दोगन यांनी केली.