वॉशिंग्टन – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले इराणच्या लष्कराचे वरीष्ठ अधिकारी जनरल कासेम सोलेमनी यांनी अमेरिकेच्या चार दूतावसांवर हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती मिळाली होती असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या बगदाद मधील दुतावासासह अन्यत्र तीन दूतावसांवर हल्ले करण्याची योजना त्यांनी आखली होती. पण त्यांचा वेळीच खात्मा करण्यात आम्हाला यश आल्याने आमच्या देशांतील अनेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सोलेमनी यांच्या वर हल्ला करण्याच्या आधी त्याच्या कारवायाच्या संबंधातील सज्जड पुरावे अध्यक्षांच्या नजरेसमोर आणले होते. त्यामुळेच त्यांनी सोलेमनी याला ठार करण्याचे आदेश दिले होते असेही सांगण्यात येत आहे.