नवी दिल्ली : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात 1 पूर्णांक 8 दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे.
नोव्हेंबर -2019 मधे उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर 2 पूर्णांक 7 दशांश टक्के राहीला, याच महिन्यात वीजनिर्मिती आणि खाणक्षेत्रातल्या उत्पादनात मात्र घट झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढीचा दर शून्य पूर्णांक 6 दशांश टक्के राहिला. एप्रिल ते नोव्हेंबर-2018 मधे हा दर 5 पूर्णांक 6 दशांश टक्के होता.