सातारा- सातारा औद्योगिक क्षेत्रातील ट्रक टर्मिनस या प्रकल्पाला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून ट्रक टर्मिनस विकसित करण्यासाठी 9 कोटी 48 लाख रुपयेखर्चास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती मॅन्युफॅक्चरर्स असिोएशन ऑफ सातारा (मास)चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व “मास’ने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
सातारा औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योजकाना कच्चा माल पुरवठा करणारे ट्रक, टेंम्पो, मोठे कंटेनर यांच्या पार्किंगची मोठी समस्या होती. अशी वाहने रस्त्यावर उभी करावी लागत होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीबरोबरच इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा “मास “या उद्योजकाच्या संस्थेने अनेक वर्ष याबाबत सातत्याने एमआयडीसी कार्यालयाकडे तसेच अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.
त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही “मास’च्यावतीने ही मागणी सांगण्यात आली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक घेऊन ट्रक टर्मिनस मंजूर करून घेतले. महाराष्ट्र स्कूटर्सच्यानजिक लवकरच ट्रक टर्मिनसचे काम सुरू होणार आहे.
6से श्री. मोहिते यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्योजकांनी समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. ट्रक टर्मिनस झाल्यामुळे उद्योजकांकडे येणाऱ्या वाहनांची पार्किंग समस्या तसेच इतर महत्त्पूर्म प्रश्न मार्गी लागणार आहेत. एमआयडीसीतील सर्व उद्योजकांच्यावतीने “मास’ने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले आहेत. ना. उदय सामंत यांचे बरोबरच्या बैठकीला राजेंद्र मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ ,माजी अध्यक्ष उदय देशमुख (नाना), सचिव डी. वाय. पाटील, सहसचिव राजेश चोप्रा व संचालक उपस्थित होते.