नवी दिल्ली : छत्तीसगढ भाटापारा येथील खमरिया गावाजवळ मालवाहू ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ४ चिमुकल्यांचा देखील समावेश असल्याची माहिती सामोर येत आहे. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री उशिराची असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात २० जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे तर २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना भाटापारा आणि बलौदा बाजार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
11 people dead in pickup van-truck collision in Balodabazar-Bhatapara district of Chhattisgarh: Police
— Press Trust of India (@PTI_News) February 24, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार अपघातातील सर्व जण एकाच कुटुंबातील असून ते एका कार्यक्र्मावरून परत येत असताना झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा अपघात भाटापारा येथील खमरिया गावाजवळ मालवाहू ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने झाला आहे. दोन्ही वाहनांची धडक एवढ्या जोरात होती कि यात पीक अप व्हॅनचा चुराडा झाला.