कोलकाता – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी तृणमूल छात्र परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष सायोनी घोष यांची शालेय भरती घोटाळ्याच्या प्रकरणात सलग अकरा तास चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, घोष यांना या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल तसेच त्यांची मालमत्ता, फ्लॅट खरेदी, आयटी रिटर्न, बॅंक खात्याचे तपशील आणि गुंतवणुक या बाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.
सायोनी घोष,या बंगाली अभिनेत्रीही आहेत. त्यांनी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर सांगितले की आपण तपास अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य केले असून यापुढेही त्यांनी आपण सहकार्य करीत राहु. त्यांनी मला कोणते प्रश्न विचारले गेले ते मी सांगू शकणार नाही. मी काही मूलभूत कागदपत्रे सादर केली आहेत. मी त्यांना सहकार्य केले आहे आणि मला वाटते की ते कमी-अधिक प्रमाणात समाधानी आहेत असे त्या म्हणाल्या. तृणमुल छात्र परिषद ही तृणमूल कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा आहे.ईडीने शालेय भरती घोटाळ्याच्या प्रकरणात आत्तापर्यंत पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी, त्यांची जवळची मैत्रीण अर्पिता मुखर्जी आणि शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.