मुंबई – मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा अमृता खानविलकरचा पती हिमांशू मल्होत्रा हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच तो ‘मौका या धोका’ या वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेकर नुकताच समोर आला आहे. यामध्ये हिमांशू बोल्ड सीन्स दिले आहेत. या पार्श्वभूमीवर हेमांशूने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली.
या मुलाखतीत हा व्हिडिओ पाहिल्यावर पत्नी अमृताची प्रतिक्रिया काय होती, असा प्रश्न हेमांशूला विचारण्यात आला. यावर खुलासा करताना हेमांशू म्हणाला की, “बोल्ड सीन्सबद्दल तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिने सर्वात आधी पोस्टर पाहिलं आणि मग ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहून ती जोर जोरात हसू लागली. तिला माहित आहे की हे आमचं काम आहे. ती सुद्धा एक अभिनेत्री आहे आणि त्यामुळे या गोष्टी चांगल्या समजतात. ‘मौका या धोखा’ या सिरीजची झलक पाहिल्यावर अमृता मला म्हणाली होती की, मी काहीतरी नवीन करत आहे. नवनवीन भूमिका कराव्यात असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. तुम्ही आधीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं केलंच पाहिजे.”
https://www.instagram.com/reel/Ct0rFLJhi4b/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, ‘चंद्रमुखी’ चित्रपटासह अमृता ‘ऑटोग्राफ’ सिनेमातही दिसली होती. ‘ऑटोग्राफ’ सिनेमाचा स्टार प्रवाह वाहिनीवर थेट प्रीमियर दाखवण्यात आला होता. यानंतर आता अमृता लवकरच ‘कलावती’ सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात अमृतासह तेजस्विनी लोणारी, संजय नार्वेकर, हरिश दुधाणे,संजय शेजवळ, नील सालेकर, ओंकार भोजने, दिप्ती धोतरे हे कलाकार देखील असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.